About Us

image

वाघोबा मित्र मंडळ (रजि.)
अखिल निळेगाव, नालासोपारा(पश्चिम)
स्थापना २०१६

सार्वजनिक माघी गणेशोत्सव
|| वाघोबाचा विघ्नहर्ता ||

वाघोबा मित्र मंडळ गेली ११ वर्षे सातत्याने सार्वजनिक माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने, उत्साहाने व सामाजिक बांधिलकीच्या भावनेने साजरा करत आहे. हा उत्सव केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित न राहता, तो संस्कृती, एकजूट आणि समाजसेवेचे प्रतीक बनला आहे.

प्रत्येक वर्षी सदर मंडळाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यासोबतच अत्यंत भव्य, आकर्षक व नियोजनबद्ध स्वरूपात श्री गणेशांचे आगमन केले जाते. उत्सवाच्या माध्यमातून भक्ती, आनंद व सकारात्मक ऊर्जा समाजात पसरवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो.

सार्वजनिक माघी गणेशोत्सव साजरा करत असताना वाघोबा मित्र मंडळ सामाजिक भान व जबाबदारी जपते. समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून मंडळाकडून रक्ततपासणी शिबिरे, नेत्रतपासणी शिबिरे, गरजूंसाठी दानधर्म, तसेच पर्यावरण संवर्धन व स्वच्छता अभियान अशा अनेक सामाजिक उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यविचारांचा व आदरणीय लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेचा वारसा वर्षानुवर्षे जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न वाघोबा मित्र मंडळ करत आहे.

धन्यवाद!

Our Gallery


Media Partners - 2026

Our Location

Waghoba/Mhasoba Mandir, Nilegaon,
Behind Funfiesta, Nallasopara (West),
Maharashtra, India - 401203